
– गळफास घेत जीवन यात्रा संपवली
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
नरसाळा येथील एका बावीस वर्षीय युवकाने नागपूर येथे भाड्याच्या खोलीत गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची दुखद घटना शुक्रवारी उघडकीस आली.
सौरव सुभाष मंजेकार (२२) रा.नरसाळा असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
सौरव हे काही दिवसा आधी नागपूर येथे कामाच्या शोधात गेले होते.तिथे ते भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते.दरम्यान आज सकाळी राहत्या खोलीत सौरव यांनी गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली.
सौरव यांनी आत्महत्या का केली…? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.मृत सुभाष यांचे पश्चात आई- वडील,दोन भाऊ,आजी-आजोबा असा बराच मोठा आप्तपरिवार असुन आज सायंकाळी पाच वाजता नरसाळा येथील स्मशानभूमीत त्यांचे पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.