
– प्रा.राजेश घुमे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगावातील कुमार कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिटयूट येथे २६ जुन रोजी विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी होऊ घातलेल्या परीक्षांबाबत प्रा.राजेश घुमे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे द्वारा कॉम्प्युटर टायपिंग (G C C TBC) ही अंदाजित परीक्षा १२ जुलै रोजी सुरु होत आहे.त्या अनुषंगाने कुमार कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट येथील विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी परिक्षा सेंटर बाबत माहिती,हॉल तिकीट,मॅन्युअल टायपिंग, कॉम्प्युटर टायपिंग,स्टेनोग्राफर, शॉर्टहॅन्ड,शासकीय व निमशाकीय आदी महत्त्वपूर्ण बाबींची माहिती कुमार कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य राजु घुमे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना देत मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा.राजु घुमे यांचे सह कुमार कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट येथील विद्यार्थी उपस्थित होते.