
– लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल वणी येथील विद्यार्थिनी
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
नुकताच इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. यात मारेगाव तालुक्यातील खैरगाव (बु) येथील कु. निधी संजय आवारी ही विद्यार्थिनी ९१.४०% गुण घेत उत्तीर्ण झाली.ती लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल,वणी येथे शिकत होती.
ग्रामीण भागातील असलेल्या निधीला घरूनच शिक्षणाचा वसा मिळालेला आहे. निधी पहिल्या वर्गापासून लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल ,वणी येथील विद्यार्थिनी आहे.ती संजय आवारी यांची कन्या आहे.
दरम्यान नुकताच एसएससी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात निधीने ९१.४०% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले असून निधीच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कु.निधीने आपल्या यशाचे श्रेय आई,वडील संजय आवारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना दिले आहे.