
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगाव…..
नवरगांव येथील एका २५ वर्षीय तरुणाने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना ता. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान उघडकीस आली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव कपील रविंद्र परचाके(२५) आहे. मृतक युवक नवरगांव येथे वास्तव्यास असून त्यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय होता. ता. ११ फेब्रुवारीला कपील यांनी घरातील हाॅलच्या मागच्या खोलीत लाकडी फाट्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेतला.दरम्यान मृतकाचे थोरले बंधू कामावरुन सायंकाळी साडेपाच वाजता घरी आले असता घरातील हॉलच्या मागच्या खोलीमध्ये कपील लाकडी फाट्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने घर शेजारील व नातेवाईकांना माहीती दिली. पोलिसांना माहीती दिली. पोलीसांनी तत्काळ पोहचत पंचनामा करत उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात शव पाठविण्यात आले.पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
मारेगांव तालूका हा आदिवासीबहुल तालुका आहे.तसेच आत्महत्याग्रस्त तालूका म्हणून सुध्दा मारेगाव तालूक्याची नवीन ओळख तयार झाली आहे. मध्यंतरी आत्महत्येचे प्रमाण कमी झाले होते मात्र आता एकाच दिवशी दोन आत्महत्या झाल्याने तालूका पुरता हादरुन गेला आहे.आत्महत्याचे प्रमाण वाढू नये यासाठी शासन प्रशासन,सामाजिक संस्था, यांच्याकडून जन जागृतीसह इतरही प्रबोधनात्मक कार्यक्रम झाल्यास आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. असे सुतोवाच आहे.