
धामनी रस्त्यावरील बंद असलेले पथदीवे
♦शहरातील धामणी रोड स्थित पथदिवे बंद
•लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव शहरातील धामणी रोड स्थित पथदिवे गेल्या कित्येक दिवसापासून बंद असून रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.बरीच रेलचेल रहात असलेल्या सदर रस्त्यावरती रात्रीच्या वेळी ‘किर्र’अंधाराचे साम्राज्य पसरत असून पथदीवे बंद असल्याने एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर रस्ता हा धामणी,मदनापुर तसेच कुंभा ह्या गावांना जोडणारा मुख्य मार्ग असुन धामणी रोडवरती वाहनांची रेलचेल अविरत सुरू असते.परंतु गेल्या कित्येक दिवसापासून सदर रोडवरील पथदिवे बंद असल्याने रस्त्यावरून आवागमन करणाऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत असून धामणी रोडवरील पथदिवे लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.