
– स्वच्छता ही सेवा अंतर्गत प्रभातफेरी
– अंगणवाडी,जि.प.शाळा व ग्रामपंचायतचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
अवघ्या देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे.ता.२३ सप्टेंबर रोजी तालुक्यातील वनोजा देवी येथे माझी माती माझा देश अभियान अंतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.अंगणवाडी,जि.प.शाळा व ग्रामपंचायत कार्यालयाच्या संयुक्त पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.यात स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध उपक्रम साजरे केले जात आहे. याची प्रचिती २३ सप्टेंबर रोजी मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी येथेही आली.
येथील ग्रामपंचायत,जि.प.शाळा व अंगणवाडी यांच्या संयुक्त पुढाकाराने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘माझी माती माझा देश’ अभियाना अंतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.गावातुन प्रभातफेरी काढण्यात आली.
या अमृत कलश यात्रेत स्थानिक शेतकऱ्यांकडून कलशामध्ये माती व भूमिहीन कुटुंबाकडून चिमुटभर तांदूळ घेत आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला.यावेळी पंचप्राण शपथ घेण्यात आली.यात गावातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी वनोजा देवी येथील सरपंचा सौ.डीमनताई गो. टोंगे, गोवर्धन टोंगे,उपसरपंच प्रशांत प्र.भंडारी, ग्रामसेवक ईनुस सैय्यद, मुख्याध्यापक चटप,शिक्षक वृंद,ग्रामपंचायत सदस्य व अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचेसह वनोजा देवी येथील महिला व नागरिक उपस्थित होते.