
– न.प.ने कडक कारवाई करण्याची गरज
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : प्रफुल्ल ठाकरे
शहरातून जाणाऱ्या मुख्य महामार्गावर तसेच शहरातील इतर रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.मोकाट जनावरांमुळे वाहन चालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार असुन आपली जनावरे रस्त्यावर सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुद्ध नगरपंचायत ने कडक कारवाई करण्याची गरज आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच चौका-चौकात जनावरे रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने वाहनचालकांसह पादचारी त्रस्त झाले आहेत.काही केल्या मोकाट जनावरे रस्त्यावरून हलत नसल्याने रस्त्याच्या बाजूने वाहने चालविण्याची वेळ वाहनधारकांवर येत आहे.
मुख्य रस्त्यांसह शहरातील वसाहतींमध्येही मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढल्याने गल्लीत खेळणाऱ्या लहान मुलांनाही याचा त्रास होऊ लागला आहे.
जनावरे रस्त्यावर सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुद्ध नगरपंचायत ने कडक कारवाई करण्याची गरज असुन मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.