
– मारेगाव शहर अध्यक्ष पदी चांद बहादे
– राजु उंबरकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मारेगाव शहर व तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून मारेगाव तालुका अध्यक्ष पदी रुपेश ढोके तर शहर अध्यक्षपदी चांद बहादे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने तसेच जि.उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्या पाठपुराव्याने मनसे नेते राजू उंबरकरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन ही नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मारेगाव तालुका कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली.यात मारेगाव शहरातील सुपरिचित व्यक्तिमत्व व मनसेचे कार्यकर्ते चांद बहादे यांची वर्णी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मारेगाव शहर अध्यक्षपदी लागली आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मारेगाव तालुकाध्यक्षपदी रुपेश ढोके,शहर संघटक नबी शेख, कुंभा विभाग अध्यक्ष आदित्य बुच्चे तर मार्डी विभाग अध्यक्षपदी रोहित हस्ते यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने तसेच मनसे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्या पाठपुराव्याने मनसे नेते राजू उंबरकरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन वरील नियुक्त्या करण्यात आल्या.
जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव लढण्याची तत्परता दाखवुन पक्ष वाढीस सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे मनसेच्या मारेगाव शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर चांद बहादे यांनी सांगितले.