
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव येथील एका ३२ वर्षीय विवाहित युवकाने जुन्या न्यायालयाच्या मागे असलेल्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार ता. ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान उघडकीस आली.
मारोती अंबादास आत्राम(३२ ) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहित युवकाचे नाव असून मृतक मारेगाव येथे प्रभाग क्रमांक २ मध्ये वास्तव्यास होते.
दरम्यान आज पहाटे ४ वाजता मृतक हे फिरायला जातो असे सांगून घरुन निघून गेले. मात्र प्रातःविधीला जाणाऱ्यांना सकाळी ९ वाजेदरम्यान, राज्य महामार्गावरील जुण्या नायालयाच्या पाठीमागील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आढळल्याने एकच खळबळ उडाली. पोलीसात माहीती देताच पंचनाम करुन उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.