
– स्त्री शक्ती फाउंडेशन व एकविरा पतसंस्था मारेगाव यांचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
‘स्त्री शक्ती फाउंडेशन’ व ‘एकविरा पतसंस्था मारेगाव’ यांचे पुढाकाराने १७ एप्रिल रोजी शहरातील एकविरा पतसंस्थेच्या प्रांगणात सामाजिक सलोखा राखत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुस्कान नवाज शरीफ यांनी रमजान महिना व इफ्तार पार्टीचे महत्त्व यावर उपस्थित भगिनींना योग्य मार्गदर्शन केले.
पवित्र रमजान महिन्यात मारेगाव येथील मुस्लिम भगिनींना एकत्र आणत त्यांचे करिता स्नेहभोजनाचे आयोजन येथील एकविरा पतसंस्थेच्या प्रांगणात १७ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता ‘स्त्री शक्ती फाउंडेशन’ व ‘एकवीरा पतसंस्था मारेगाव यांचे पुढाकाराने करण्यात आले होते.
सामाजिक सलोखा राखत एकतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास शहरातील मुस्लिम भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मोठ्या आनंदात व उत्साहात स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सौ. किरण देरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित भगिनींशी यथेच्छ संवाद साधला.
दरम्यान एका सहा वर्षीय चिमुकलीने रोजा ठेवल्याने यावेळी चिमुकलीचा सत्कार करण्यात आला हे विशेष.
यावेळी सौ.किरण देरकर , मुस्कान नवाज शरीफ,जिजा वरारकर ,माधुरी नगराळे ,इंदुताई किन्हेकार ,पूजा मडावी,सौ.मत्ते ,सुरेखा ढेंगळे यांचे सह शहरातील शेकडो मुस्लिम भगिनी उपस्थित होत्या.