
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगाव……
मागील पाच वर्षांपासून मारेगांव येथे सीसीआय खरेदी बंद होती. परंतु मागील चार महिन्यापासून सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर आज ता. २४ डिसेंबर रोज मंगळवार ला भारतीय कापुस निगम लिमिटेड यांची मारेगांव व उपबाजार पेठ मार्डी येथे कापुस खरेदी सुरु होत असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
मागील पाच वर्षां पासून तालुक्यातील सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. मात्र मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांनी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मागील चार महीन्याअगोदरच सीसीआय केंद्र सुरु व्हावे यासाठी विविध राजकीय पक्षाच्या वतीने पाठपुरावा केला.
त्यामुळेच तब्बल वर्षा नंतर तालुक्यात सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी ता. १३ डिसेंबर रोजी सीसीआय उपमहा प्रबंधक अकोला यांचे पत्र बाजार समितीला प्राप्त झाले होते. ता १८ डिसेंबरला कापूस खरेदी कारण्यास केंद्र घेण्यास इच्छुक असणाऱ्या जिनिंग कडून निविदा मागितल्या गेल्या. व २० डिसेंबर रोजी निविदा खुल्या करुन अखेर आज ता. २४ डिसेंबर रोज मंगळवार ला मारेगांव व उपबाजार मार्डी येथे सीसीआय कापूस खरेदी सुरु करण्यात येणार आहे.
कापुस गाडी सोबत कापुस पेरा असलेला चालु वर्षाचा सात- बारा (७/१२) दोन प्रति. कापुस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड दोन प्रती.
कापुस विक्री करतांना शेतकरी स्वतः हजर राहणे अनिवार्य असुन कापसाचा ओलावा हा ८ ते १२ टक्के चे वर आल्यास सी.सी.आय. चे सुचने प्रमाणे कापुस स्विकारल्या जाणार नाही. शेतीमाल विक्री करताना बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांना विक्री करावा व खरेदीदाराकडून अधिकृत हिशेबपट्टी घ्यावी. जेणेकरून भविष्यात शासनाकडून शेतीमालासाठी अनुदान जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणे सुलभ होईल. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात बाजार समितीचा परवाना न घेता काही व्यापारी अनधिकृतपणे शेतीमालाची खरेदी करीत असून, असे व्यापारी निदर्शनास आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करणे सुलभ जाईल.” –
गौरीशंकर खुराणा, सभापती
कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगाव