
– नियोजन शून्य कारभार कुणाचा…?
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
प्रफुल्ल ठाकरे…..
शहरातील नागरिक अजय रायपुरे यांच्या अथक प्रयत्नानंतर आरटीओ विभागाने वणी येथे होणाऱ्या तीन आरटीओ कॅम्प पैकी एक कॅम्प रद्द करून मारेगाव येथे होणार असल्यावर शिक्का मोर्तब झाला असता शहरात २० फेब्रुवारी रोजी आरटीओ कॅम्प नियोजित होता.
“आरटीओ कॅम्प झाला” असे आयोजकांचे सांगणे असून ‘ऑनलाइन डॉक्युमेंट प्रोसेस होत नसल्याचे’ आरटीओ कडून आयोजकांना कळविण्यात आले होते. ड्रायव्हिंग लायसन्स करिता लागणारी कागदपत्रे तर गोळा केली गेली पण त्या पुढील कोणतीच गोष्ट मार्गी लागु शकली नसल्याने मारेगावातील आरटीओ कॅम्प “फुसका बार” असल्याची खमंग चर्चा जनमानसात सर्वदूर रंगली आहे.
मारेगाव शहरात आरटीओ कॅम्प लवकरात लवकर सुरू करण्यात यावा याबाबत शहरात जोरदार प्रयत्न सुरू होता. प्रयत्नांना यश आल्याचा गाजावाजा आयोजकांकडून करण्यात आला.आरटीओने २० फेब्रुवारी रोजी शहरात आरटीओ कॅम्प होणार हे सुनिश्चित केले होते.परंतु आरटीओ कॅम्प शहरात नेमका कुठे होणार…? हे आयोजकांनी स्पष्ट केले नव्हते. शेवटी कॅम्पच्या दिवशी विश्रामगृह येथे कॅम्प होणार असल्याचे सुनिश्चित करण्यात आले होते.
फेब्रुवारी व मार्च दोनही कॅम्पच्या नियोजित दिवशी आरटीओ शहरात दाखल झाला असता २८० व्यक्तींनी लायसन्स करिता कागदपत्र जमा केल्याचे आयोजकांचे सांगणे असुन ऑनलाईन डॉक्युमेंट प्रोसेस होत नसल्याचे आरटीओ कडून कळविण्यात आले असून कॅम्प बाबत आरटीओ कडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याचे आयोजकांचे म्हणने आहे.
२९ मार्च पर्यंत आरटीओने ‘ऑनलाईन प्रोसेस’ चा तिढा न सोडवल्यास पुनश्च एकदा मारेगावात आरटीओ च्या गाडीला अडवून चक्काजाम केला जाईल असा गर्भित इशारा अजय रायपुरे यांनी मा.मुख्यमंत्री, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला असुन सर्वसामान्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.