
– प्रेम व आपुलकीचा उत्सव उत्साहात साजरा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : प्रफुल्ल ठाकरे
शहरात २२ एप्रिल रोजी मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गौसिया मस्जिद चे मौलाना रीहान रशीद यांनी सामुदायिक नमाजपठण केले.शहरासह देशात सुख, शांती आणि एकोपा नांदो,अशी दुआ या वेळी करण्यात आली.
रमजान पर्वातील महिनाभराचे रोजा मुस्लिम बांधवांनी पूर्ण करत शनिवारी (ता. २२) रमजान ईद साजरी केली.
सकाळी नऊचे सुमारास शहरातील ईदगाह मैदानावर गौसिया मस्जिद चे मौलाना रीहान रशीद यांचे नेतृत्वात हजारो मुस्लिम बांधवांनी ईदचे सामुदायिक नमाजपठण केले. त्यांचेकडून खुदबा पठण करण्यात आला.त्यानंतर नमाज आणि फातिया पठण झाले. सलाम पठण करण्यात येऊन ईदच्या नमाजाची सांगता झाली.
यावेळी मुस्लिम बांधवांनी मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी आणि १० दिवस मस्जिद मध्ये एतेकाफ (एकांत मध्ये राहून सतत उपासना करणे) करणाऱ्यांचा जाहीर सत्कार केला.
गौसिया मस्जिद चे मौलाना रीहान रशीद यांचेकडून मुस्लिम बांधवांसह शहरवासीयांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नमाजची सांगता होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला , प्रेम व आपुलकीचा उत्सव शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.