
— भारतीय जनता पक्षाचे निषेध आंदोलन
— तहसिलदारांना दिले निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
हिन्दू धर्माबाबत राहुल गांधी यांनी हिन्दू व हिन्दु धर्माबाबत केलेले बेताल वक्तव्य हिन्दु धर्माच्या भावना दुखावणारे असल्याने त्यांनी शब्द परत घ्यावे व हिन्दु धर्मियांची माफी मागावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्थानिक मार्डी चौकात ता. ४ जूलै रोजी, भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे व भाजप तालुकाध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात निदर्शने करत निषेध व्यक्त करुन तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
लोकशाहीत प्रत्येक मानसाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु कोण्या एका जातीधर्मावर वा कोणत्याही धर्माच्या भावणा दुखावतील अशा प्रकारचे वक्तव्य करणे ही चिंताजनक बाब आहे. दरम्यान ता २ जुलै रोजी देशाच्या सर्वोच्च सभागृहात राहुल गांधी यांनी हिंदू धर्माबद्दल हिंसक या शब्दाचा वापर करत, स्वतःला हिंदु म्हणवणारे २४ तास फक्त हिंसा करतात या बेताल वक्तव्यामुळे समस्त हिंदु व हिंदु धर्माच्या भावना दुखावल्या असल्याचा निवेदनातून ठपका ठेवण्यात आला असून राहुल गांधी यांनी शब्द परत घ्यावे आणि समस्त हिंदु धर्माच्या लोकांची माफी मागावी यासाठी ता. ०४ जुलै रोजी दु. १२.०० वाजता स्थानिक मार्डी चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करत, कार्यवाहीसाठी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजप किसान आघाडी जिल्हाध्यक्ष शंकर लालसरे, भाजप तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे, नगर सेवक वैभव पवार, अनुप महाकुलकर, मारोती तुराणकर, पवन ढवस, शशिकांत आंबटकर, यांचेसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.