
– राजमुद्रेचा अवमान : नाणे स्विकारण्यास व्यावसायिकांकडुन नकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
दहा रुपयांचे नाणे सुरू असून ते चलनाचा एक भाग आहे असे रिझर्व बँकेने सांगितले असले तरी शहरासह तालुक्यातील बहुतांश व्यापारी व ग्राहकांकडून दहा रुपयाचे नाणे स्वीकारण्यास टाळाटाळ होत आहे.दहा रुपयाच्या नाण्याबाबत तालुक्यात शेकडो अफवांना प्रचंड उधान आले असून दहा रुपयांच्या नाण्याबाबत असलेला गोंधळ कायम आहे.चलनात असलेले दहा रुपयांचे नाणे स्वीकारले जात नसल्याने राजमुद्रेचा सर्रास अवमान होत आहे.
दहा रुपयाचे नाणे राज्यभर चलनात आहे.मात्र शहरासह तालुक्यातील नागरिक, व्यापारी व छोटे मोठे दुकानदार नाणे घेण्यास नकार देत आहे.दहा रुपयाचे नाणे बंद झाले असून ते स्वीकारू नये अशा चर्चेला शहरासह तालुक्यात पेव फुटल्याने कुठलाच व्यापारी अथवा ग्राहक दहा रुपयाचे नाणे स्वीकारत नसल्याचे वास्तव आहे.परिणामी अनेकांकडून दहा रुपयाचे नाणे स्विकारण्यास टाळाटाळ केली जात आहे.
तुर्तास कोणत्याही बँकेने दहा रुपयाचे नाणे बंद झाले असल्याने ते घेऊ नका…असे सांगितले नसताना मारेगाव तालुक्यात मात्र व्यापाऱ्यांची मनमानी दिसून येत आहे.
दहा रुपयाचे नाणे स्वीकारण्यास तालुक्यात सर्वत्र नकार मिळत असून राजमुद्रेचा सर्रास अवमान केला जात आहे.बँकांनी व प्रशासनाने याकडे सपशेल डोळेझाक केली असल्याने नागरिकांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे.
दहा रुपयाचे नाणे स्थानिक तथा परिसरात सर्वत्र स्वीकारण्यास चक्क नकार मिळत असून सदर नाणी बंद झाल्याची अफवा तालुक्यात पसरली आहे.आता नागरिक सुद्धा हे नाणे एकमेकांकडून स्वीकारत नसून नाणे चलनातून बाद झाल्याचे चित्र शहरासह तालुक्यात पहावयास मिळत आहे.