
– स्थानिक राष्ट्रीय विद्यालयात आयोजन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
आपला कार्यकाळ पूर्ण करून सेवानिवृत्त झालेले मारेगाव येथील गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडूरवार यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभाचे आयोजन तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने स्थानिक राष्ट्रीय विद्यालयात २१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. यावेळी शाल व श्रीफळ देऊन सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडूरवार यांचा सत्कार करण्यात आला.
मारेगाव पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी म्हणून रुजू झालेले नरेंद्र कांडूरवार यांचा कार्यकाळ नुकताच संपला. त्यांच्या कार्यकाळात वर्ण द्वेशाचे प्रकरण कमालीचे गाजले होते. अवघ्या शिक्षण वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या ‘त्या’ प्रकरणाने अनेकांनी कांडूरवार यांचे कार्यपद्धतीवर काळा ठपका ठेवण्याचा नाहक प्रयत्न केला.परंतु आपला स्वभाव तसेच आपली कार्यपद्धती यामुळे कांडुरवार यांनी आधीच मारेगाव शिक्षण वर्तुळात आपला वेगळा ठसा उमटविला होता.परिणामी या पूर्व नियोजित षडयंत्रात अनेक शिक्षक संघटना त्यांचे समर्थनार्थ उभ्या ठाकल्या होत्या.
दरम्यानच्या काळात गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांदुरवार यांचा कार्यकाळ पूर्ण झाला.तत्पुर्वी तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा आलेख ढासळला असताना कांडूरवार यांनी आपल्या परीने येथोचित प्रयत्न करून प्राथमिक शाळात शिक्षकांची कमतरता असतानाही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून सुनियोजित नियोजन करून अनेक चांगल्या गोष्टींचा समन्वय घडून आणला होता.
कायम कर्तव्याची जाण असणाऱ्या गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडूरवार यांचा सत्कार नुकताच मारेगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने स्थानिक राष्ट्रीय विद्यालय २१ ऑक्टोंबर रोजी करण्यात आला. यावेळी शाल व श्रीफळ देऊन कांडुरवार यांना त्यांच्या कार्याची पावती देण्यात आली.
सदर सेवानिवृत्त सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विनोद संगीतराव तर प्रमुख अतिथी प्रकाश भुमकाळे,भुमन्ना बोमकटीवार,निरज डफळे, नागोराव चौधरी आदी उपस्थित होते.
सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली जेनेकर यांनी तर आभार प्रदर्शन सुनील आष्टेकर यांनी केले.
सदर सत्कार सोहळ्यास तालुक्यातील बहुतांश मुख्याध्यापकांची उपस्थिती होती.