
– संशयीतांना ३१ मार्च पर्यंत पोलीस कस्टडी
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
नवरगाव येथील डॉ.हाजरा यांना शस्त्राच्या धाकावर नाचवत १३ मार्च रोजी अज्ञात आरोपींनी चार लाख रुपयांची लूट करुन पोबारा केला होता.या घटनेने शहरात प्रचंड खळबळ माजली होती.घटनेच्या दुसऱ्याच दिवशी एका वेगळ्या प्रकरणाशी निगडित आदिलाबाद पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले होते.
त्या संशयित आरोपींची लिंक सीने स्टाईल लूट प्रकरणाशी जुळून असल्याचे लक्षात येताच मारेगाव पोलिसांकडून “त्या” संशयित आरोपींना ताब्यात घेण्याच्या हालचालींना वेग आला असता ता.२४ मार्च रोजी ‘त्या’ चारही संशयित आरोपींना मारेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून ३१ मार्च पर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे.
मोहम्मद अर्शद अब्दुल्ला (३०) मस्जीद ईमाम (शिक्षक) रा.ग्राम.जीराहीरा ता.पाहारी जि.भरतपुर(राजस्थान),
जाकीर खान हासनी (३०),मुजाहीद खान ईद्रीस(२६),मुस्ताक खान प्रताप (२४) तीन संशयित आरोपीं रा.ग्राम.हाथीया ता.छाता जि.मथुरा (उत्तरप्रदेश) अशी लूट प्रकरणातील संशयितांची नावे असून सद्यस्थितीत चारही संशयित मारेगाव पोलिसांच्या ताब्यात आहे.
मारेगाव पोलिसांनी चारही संशयितांना पुढील सात दिवसासाठी रिमांड वर घेतले असून अद्याप चारही संशयीतांकडून “तो” गुन्हा कबूल करण्यात आला नसुन “पोलिसी खाक्या” वरच पुढील बाबी अवलंबुन असेल.
सदरची कार्यवाही मारेगाव पो.स्टे.चे ठाणेदार राजेश पुरी,सहाय्यक फौजदार प्रमोद जीड्डेवार,पो.ह.वा.आनंद अलचेवार,एन.पी.सी.अजय वाभिटकर, रजनीकांत पाटील यांनी केली.