
●कृषी पंप धारक त्रस्त.
●वीज केंद्र वाढविण्याची मागणी.
लोकशस्त्र न्युज नेटवर्क मारेगाव…….
तालुक्यात वीज केंद्राची संख्या कमी असल्याने वीज पुरवठा वारंवार खंडीत होऊन सिंचनाचा प्रश्न बिकट बनला आहे. तसेच वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास असह्य होत असल्याने तालुक्यात वीज केंद्राची संख्या वाढवावी अशी मागणी केली जात आहे.
तालुक्यात विजेची मोठी समस्या आहे.वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे.कृषी पंपाला रात्री वीजपुरवठा करणे. कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता वैतागली आहे. या संदर्भात वीज वितरणकडे तक्रार केल्यास वीज केंद्राची व कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या याकडे बोट दाखविले जाते. यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला जातो.
सन २०१५ मध्ये कुंभा येथे वीज केंद्र उभारण्याचा प्रस्ताव शासन स्तरावरून मंजूर झाला होता. जागा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायत ला पत्र ही दिले होते परंतु जागा उपलब्ध होऊ न शकल्याने हे केंद्र बनू शकले नाही.
त्यामुळे तालुक्यात वनोजा देवी, मारेगाव येथे उच्च शक्ती वीज केंद्र तर कुंभा येथे लघू शक्ती केंद्र उभारण्याची मागणी होत आहे.
वीजेचा लपंडाव हा अनेक दिवसापासुन सुरु असल्याने निवेदने दिल्या गेली, आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा प्रशासकीय स्तरावर लेखी आश्वासन दिल्या गेले. परंतु समस्या मात्र “जैसे थे ” आहे. नाईलाजाने ” सरकारी काम अन् बारा महिने थांब ” ह्याचा तालुक्यातील नागरिक अनुभव घेत आहे.