
– सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांचे हस्ते नियुक्तीपत्र
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या मारेगाव तालुकाध्यक्ष पदी आकाश भेले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांचे हस्ते नियुक्तीपत्र देऊन ही नियुक्ती करण्यात आली.
मागील काही काळात तालुक्यात काँग्रेसने अनेक चढ-उतार अनुभवले.तालुक्यातील काँग्रेसचा अस्थिर आलेख पाहता पक्षाशी जोडणारे एकनिष्ठ नेतृत्व गरजेचे होते.
परिणामी सदैव समाज सेवेत तत्पर असलेले व जनसामान्यांकरिता धडपडणारे आकाश भेले यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या मारेगाव तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष (अ.जा.वि.) सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांचे हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे.
गत काही काळात तालुक्यात प्रचंड उलथापालथ अनुभवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पक्ष वाढीस तन- मन-धनाने तत्पर राहुन त्या अनुषंगाने पक्ष विस्तार करण्याचे कडवे आव्हान आकाश भेले यांचेसमोर राहणार आहे.