
– विजय वडेट्टीवार यांचे हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यात काँग्रेस पक्षास उभारणी देण्याकरिता तालुका काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या तालुका अध्यक्ष पदी शाहरुख शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.येथील आयोजित एका कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांचे हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून ही नियुक्ती करण्यात आली.
मागील काही काळात तालुक्यात काँग्रेसने अनेक चढ-उतार अनुभवले.तालुक्यातील काँग्रेसचा अस्थिर आलेख पाहता युवकांना पक्षाशी जोडणारे एकनिष्ठ नेतृत्व गरजेचे होते.
परिणामी मारेगावातील काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते शाहरुख शेख बाबा शेख यांची मारेगाव तालुका काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मारेगाव येथे आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
अल्पसंख्यांक युवकांना एकत्र घेऊन पक्ष संघटन करून पक्ष वाढीस प्रयत्न करणे ही प्रमुख जबाबदारी शाहरुख शेख यांची राहणार असुन त्या अनुषंगाने त्यांची कसोटी लागणार आहे.