
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात, तालुक्यातील चोपण येथील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या संख्येने जाहीर पक्ष प्रवेश केला.
तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ता. १८ सप्टेंबर रोजी तालुक्यातील चोपण येथे जम्बो पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, तर तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, मंगेश देशपांडे, प्रसाद ढवस, बोबडे गुरुजी, शेखर काळे, नागोराव कुळमेथे, वसंत ताजने यांची प्रमुख उपस्थिती होती.
विधान सभा निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी वणी विधान सभा क्षेत्रात निवडणूकीचे पडसाद उमटु लागले असुन आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी शहरी तथा ग्रामीण भागात भाजपा तालुकाध्यक्षांसह पदाधिकारी यांना सोबत घेऊन पक्षाच्या मोट बांधणीची मोहीम सुरु असुन युवकांसह पुरुष व गावातील अनेक नागरिकांनी संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेशाचा धडाका पहावयास मिळत आहे. त्यामुळे भाजपात सध्या तरी स्वयंप्रेरणेने युवा वर्गासह ग्रामस्थांची “इनकमिंग ” जोरात सुरु आहे.
दरम्यान तालुक्यातील चोपण येथील युवकांसह अनेक नागरिकांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपात प्रवेश केला. लक्ष वेधणारा असा हा पक्ष प्रवेश सोहळा ठरला. यावेळी गावातील पवन थेरे, विठ्ठल कुळसंगे, मोहन तुरंगे, प्रशांत खीरटकर, भारत खीरटकर, दादा अडकीने, राकेश पावडे, विजय क्षीरसागर, अनिल लेनगुळे, राजेश खीरटकर, शंकर येरमे, राजू खीरटकर, शुभम खीरटकर, वसंत देऊळकर, राहुल येरमे यांच्यासह अनेकांनी पक्षप्रवेश केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय खीरटकर, दत्तू खीरटकर, पंकज खीरटकर, अतुल खीरटकर, हेमंत चिंचोलकर यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.