
– मानव विकास योजनेअंतर्गत ८ सायकल वाटप
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
युवक विकास संस्था वणी द्वारा संचालित शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात २६ जुलै रोजी सत्र २०२२-२३ मधील इयत्ता ८ व ९ व्या वर्गातील विद्यार्थिनींना मानव विकास योजनेअंतर्गत ८ सायकल वाटप करण्यात आले.
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाचे बाळकडू घेण्यासाठी येत असतात.
शासनाच्या मानव विकास योजनेअंतर्गत गरीब व गरजू मुलींना मोफत सायकल दिल्या जातात.युवक विकास संस्था वणी द्वारा संचालित शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात ता.२६ जुलै रोजी या योजनेतून सत्र २०२२-२३ मधील ८ व ९ व्या वर्गातील विद्यार्थिनींना ८ सायकल वाटप करण्यात आले.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक हेमंत ताजणे, शिक्षिका वनिता मुक्तेश्वर दुर्गे, एम.एम.सोयाम तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.