
– नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पावसाळ्यास सुरुवात झाल्याने पशुधनाची विशेष काळजी घेण्याची नितांत गरज आहे.त्या अनुषंगाने तालुक्यातील बोटोनी येथे १२ जुलै रोजी लंपी रोग प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.यास येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पावसाळ्यात गायी, म्हैस, शेळ्या-मेंढ्या या जनावरांना विविध रोगांची लागण होण्याची होण्याची भीती असते. या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास पशुधनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी पशुसंवर्धन विभागाने जनावरांचे लसीकरणावर भर देण्यास सुरुवात केली आहे.
लंपी या चर्मरोगाची भीती सतावत असल्याने १२ जुलै रोजी तालुक्यातील बोटोनी येथे ‘लंपी प्रतिबंधक लसीकरणाचे’ आयोजन करण्यात आले होते.यास येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी एलडीओ डॉ.पुनम नागपूरे यांचेसह ए.आय.टी.सुरज देवगडे उपस्थित होते.