
– प्रशासनाने घेतली दखल
– युद्ध स्तरावर काम करून खंडित पाणीपुरवठा सुरू
लोकशास्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
प्रफुल्ल ठाकरे…
शहरातील प्रभाग क्रमांक १६ स्थित असलेली बोअर गेल्या पाच दिवसापासून बंद असल्याने येथील प्रभाग क्र.१६,१५,८ व १४ मधील पाणीपुरवठा खंडित झाला होता.पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असतानाच प्रशासनाविरोधात आंदोलनाची चर्चा सर्वत्र रंगली होती.
प्रशासनाचा गलथान कारभार ‘लोकशास्त्र’ ने चव्हाट्यावर आणत सतत याचा पाठपुरावा केला असता अखेर पाचव्या दिवशी प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेत १३ एप्रिल रोजी मध्यरात्री युद्ध स्तरावर काम करून नादुरुस्त बोअर दुरुस्त करण्यात आली आणि गेल्या पाच दिवसापासून बंद असलेला पाणीपुरवठा अखेर सहाव्या दिवशी पुर्ववत सुरू करण्यात आला.
नागरिकांच्या मूलभूत गरजेवर ‘लोकशस्त्र’ ने प्रकाश टाकत गेले पाच दिवस या संवेदनशील बाबीचा पाठपुरावा केला असता अखेर कुंभकर्णी झोपेतून प्रशासन खडबडून जागे होत चारही प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला.
‘लोकशस्त्र’ च्या वृत्ताची दखल घेत शहरातील नागरिकांना न्यायिक भूमिकेचा परिपाक ठरल्याने समाधान व्यक्त होत आहे.