
– अंगणातील सागाचे झाड छिन्नविछिन्न
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील सालेभट्टी येथील नितेश आस्वले यांचे अंगणात ता.२७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेदरम्यान वीज कोसळली.यात नितेश आस्वले यांना विजेचे चटके बसुन त्यांचे अंगणातील सागाचे झाड छिन्नविछिन्न झाले.
तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात अवकाळीचा कहर रोज सुरू आहे.दरम्यान २७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेदरम्यान सालेभट्टी येथील नितेश आस्वले यांचे अंगणात वीज कोसळली.
यात नितेश आस्वले यांना विजेचे चटके बसुन त्यांचे डोळ्याला किरकोळ दुखापत झाली तर त्यांचे अंगणातील सागाचे झाड जळुन पुर्णत छिन्नविछिन्न झाले.सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.