
न थांबता,न थकता केलेला प्रवास म्हणजे आयुष्य.येणाऱ्या प्रत्येक अडचणी वर मात करुन समोर जाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य जगणे होय.आयुष्य काय असतं… हे आपल्या शब्दात रेखाटलंय तालुक्यातील एका छोट्या कवयित्रीने…! आयुष्याच्या वर्तुळाचा डाव तिने आपल्या शब्दात मांडलाय.तिच्या विनंतीस मान देत समिक्षाने पाठविलेली तिची स्वलीखीत कविता मांडत आहो…!
आयुष्य……..!
आयुष्याच्या वाटेवरती अनेक काटे आले पण माझे विचार बघुनी ते वाटेच्या बाहेर निघून गेले….
आयुष्य हे साधं सरळ नसते,
आयुष्याच्या वाटेवर अनेक काटे असते….
आयुष्याला समजदारिने समजूनच घेतले नसते,तर आज आयुष्या मधे समजूनच घेता आले नसते…
आयुष्याच्या वाटेला आधार हवा असते,आयुष्य हे खुप कठीण असते,म्हणून वाटेवर अंधार वा उजेड दिसत नसते…
देवाने जन्माला दिलेच नसते,तर आज आयुष्य काय…? हे कळलेच नसते…
शेवटी आयुष्य हे संपून जात असते,पण आपल्या मागचा भोग काही सुटतं नसते….