
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
येथील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम शाळेमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारेगाव न्यायालयाचे न्यायाधीश श्री. के.पी.दवने होते. यावेळी विद्यार्थ्यांना विविध कायद्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
राष्ट्रीय विधी सेवा आयोग, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे, यवतमाळ जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अध्यक्ष श्री. एन.व्ही. न्हावकर व सचिव, श्री. के.ए. नहार, यांच्या मार्गदर्शनाखाली, मंगळवार 30 आगस्ट ला विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालय, मारेगाव, येथे तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ मारेगांव मार्फत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारेगाव न्यायालयाचे न्यायाधीश श्री. के. पी.दवने होते. प्रमुख अतिथी म्हणून मारेगावचे ठाणेदार शंकरराव पांचाळ, शाळेचे अध्यक्ष राजेश पोटे, ऍड.मेहमूद पठाण, व ऍड प्रयाग रामटेके मंचावर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी अँटी रॅगिंग कायदा, स्त्रीभ्रूणहत्या व महिला विषयक विविध कायदे, जातीभेद व इतर सामाजिक दुष्कृत्य बद्दलचे कायदे, पीडितांना मिळणारे विविध सहाय्य, वाहतूक च्या नियमावली आणि इतर माहितींवर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक महेश ढेंगळे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक शंकर सिडाम यांनी केले.
यावेळी शाळेचे विद्यार्थी सह शिक्षक कार्यक्रमाला हजर होते.
शिबिराचे यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना बोंडे तसेच सर्व शिक्षक, न्यायालयीन कर्मचारी पांडुरंग वासाड,सागर मडावी,कृष्णा जाधव, पोलीस जमादार अजय वाभीटकर यांनी परिश्रम घेतले.