
– ९४ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
येथील स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूल येथे इयत्ता पाचव्या वर्गात शिकत असलेली कु.जिया जितेंद्र नगराळे ही चिमुकली २९ एप्रिल रोजी झालेल्या नवोदय परीक्षेत ९४% गुण घेत उत्तीर्ण झाली.कु.जिया ही येथे शिकवणी वर्ग घेत असलेल्या सौ.ताटकोंडावर यांची विद्यार्थिनी होती हे विशेष उल्लेखनीय.
नुकताच २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.यात मारेगावातील स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूल येथे इयत्ता पाचव्या वर्ग शिकत असलेली जितेंद्र नगराळे यांची सुकन्या कु.जिया नगराळे ही ९४% गुण घेऊन उत्तीर्ण झाली.विशेष म्हणजे कु.जिया ही मारेगाव येथे शिकवणी वर्ग घेत असलेल्या सौ.ताटकोंडावार यांची विद्यार्थिनी होती.
कु.जियाने नवोदय परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून चिमुकलीने आपल्या यशाचे श्रेय आजोबा मारोती नगराळे, आई-वडील,मोठा भाऊ,सौ.ताटकोंडावार तसेच शाळेतील शिक्षकांना दिले आहे.