
– भाजपाचे खाते उघडले
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल ३० एप्रिल रोजी रात्री उशिरा जाहीर झाला असून यात काँग्रेसने १८ जागांपैकी तब्बल १७ जागांवर एक हाती वर्चस्व प्रस्थापित करत आपला गड कायम राखला आहे. तर भाजपने या निवडणुकीत एक धाव घेत आपले खाते उघडले आहे.
मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची मतदान प्रक्रिया ३० एप्रिल रोजी शांततेत पार पडली. या निवडणुकीत काही उलटफेर होणार…? की दिग्गजांची वज्रमुठ कायम राहणार…? ही उत्सुकता जनसामान्यांना असतानाच रात्री उशिरा निकाल जाहीर झाला.
यात काँग्रेसच्या दिग्गजांनी आपला बालेकिल्ला कायम राखत सदर निवडणुकीत १८ पैकी तब्बल १७ जागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून एक हाती सत्ता मिळवली. तर सत्तांतरानंतर पहिल्यांदाच भाजपने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात आपले खाते उघडले.
सर्वसाधारण सह.संस्था मतदार संघ
वसंतराव आसुटकर १६०
गौरीशंकर खुराणा १५३
गणुजी थेरे १३०
यादव काळे ११५
जीवन काळे १५४
काशिनाथ खडसे १५३
महादेव जुनगरी १४५
सह.संस्था अनु. जमाती राखीव
संतोष मडावी १६४
सर्वसाधारण महिला प्रतिनिधी
अरुणाताई खंडाळकर १८५, सुनीता मस्की १५७
इतर मागासवर्गीय
रमण डोये १४८
ग्रा.पं. सर्वसाधारण मतदार संघ
विजय अवताडे ,१९९, प्रफुल्ल विखनकर १९५
आर्थिक दुर्बल घटक
अविनाश लांबट १९९
व्यापारी अडते
महादेव सारवे:१२
देविदास बोबडे १२
हमाल मापाडी
भास्कर धांडे ४