
– राज्य कोतवाल संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
कोतवाल कर्मचारी यांना चतुर्थश्रेणीच्या सरळ सेवेच्या पदात शिपाई म्हणून नियुक्तीचा कोटा २५% वरून ४०% करण्यात आला.परंतु नियुक्त कोतवालांची सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध न करण्यात आल्याने सदर यादी प्रसिद्ध करण्यात यावी, या संबंधीचे निवेदन राज्य कोतवाल संघटनेने तीन मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
२०२१ यावर्षी एकूण कोतवाला मधून २२ कोतवालांची शिपाई संवर्गात पदोन्नती करण्यात आली.परंतु पदोन्नती करण्यात आलेल्यांची सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध न करण्यात आल्याने पदोन्नतीस पात्र असलेले व यावर्षी ४५ वर्ष पूर्ण होत असलेले कोतवाल पदोन्नती पासून वंचित राहू नये या अनुषंगाने सेवाजेष्ठता यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी याबाबतचे निवेदन राज्य कोतवाल संघटनेने तीन मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी राज्य कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत निमसटकर यांचेसह प्रशांत प्रभाते ,लल्ला कांबळे ,उत्तम पाचभाई ,राकेश संकिलवर ,चंद्रभान देवाळकर ,छाया दरोडे ,महेश पाटील उपस्थित होते.