
– मारेगाव तालुक्यातील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : प्रफुल्ल ठाकरे
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील बोटोनी नजीक असलेल्या पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार इसम ठार झाल्याची घटना २२ एप्रिल रोजी रात्री आठ वाजे दरम्यान घडली.
सूर्यभान बापूराव आत्राम (४५) रा.मेंढनी असे अपघातात ठार झालेले व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान सूर्यभान हे काही कामानिमित्त शनिवारी करंजी येथे गेले असता रात्री परतीच्या प्रवासात असताना वणी- यवतमाळ राज्य महामार्गावरील बोटोनी नजीकच्या पेट्रोलपंपा जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले.
रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या नागरिकांनी त्यांना प्राथमिक उपचाराकरिता करंजी येथील रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारार्थ त्यांना पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री पावणे बारा वाजे दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.सूर्यभान यांचे पश्चात पत्नी ,दोन मुली,एक मुलगा असा आप्त परिवार असल्याची माहिती आहे.