
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
विषारी औषध प्राशन करुन केगाव येथील एका ३५ वर्षीय इसमाने केगाव शिवारात ता.११फेब्रुवारी रोजी आत्महत्या केल्याची घटना सकाळी १० वाजेदरम्यान उघडकीस आली.
पवन आण्याजी पिंपळशेंडे (३५) हे त्यांच्या कुटुंबासह केगाव येथे वास्तव्यास असुन ते अल्पभूधारक शेतकरी असल्याची माहीती आहे. मृतक पवण मागील अनेक दिवसापासुन नैराश्यात जीवन जगत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान ता. ११ फेब्रुवारीला सकाळी सहा वाजेदरम्यान पवन शेतात जातो असे सांगून शेतात निघुन गेले. नंतर दहा वाजता सौ.अनिता पिंपळशेडे शेतात गेल्या असता पवन हे शेतामध्ये विषारी औषध प्राशन करुन मरुन पडलेले दिसले. लगेच फोन करुन घरी व शेजारी माहीती दिली तसेच मारेगाव पोलीसांना कळविण्यात आले.पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.