
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगाव……
कानडा येथे जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत च्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कानडा ग्रामपंचायत सरपंचा सौ.सुषमा रुपेश ढोके, मार्गदर्शक म्हणून उमरखेडच्या शांताताई इंगळे, तथा मार्डी येथील नूरता निमसटका होत्या.
दरम्यान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रत्येक गावातील महीलांचे सक्षमीकरण ही काळाची गरज ओळखून या दृष्टिकोनातून पावले उचलावीत.या सोबतच ग्रामस्वच्छता, बालविवाह, दारुबंदी, ग्रामसभा इत्यादी विषयांवर मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. तसेच महिला दिन हा एकाच दिवसासाठी मर्यादित न ठेवता तो सातत्याने पाळला पाहीजे असाही संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमास प्रतीक्षा आस्कर, सूवर्णा डाहूले, सूवर्णा येवले, अल्का चामाटे, गीता झीले, अर्चना धोबे, संगीता येवले, पूष्पा ढोके यांचेसह व गावातील असंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिक्षा बदखल तर आभार वंदना येवले यांनी मानले.