
– विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील पिसगाव येथील कै.गिरजाबाई माध्यमिक विद्यालयात १ ऑगस्ट रोजी स्काऊट-गाईड ‘जागतिक स्कार्फ डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
जागतिक स्काउट दिवस १ ऑगस्ट, १९०७ मधील ब्राउनसी बेटावरील पहिल्या स्काऊट शिबिराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
जागतिक स्काउट डे, ज्याला “स्काउट स्कार्फ डे” म्हणूनही ओळखले जाते,या दिवशी सर्व सक्रिय आणि माजी स्काउट्सना स्काउटिंगचे दृश्यमान स्मारक म्हणून स्कार्फ किंवा नेकर्चिफ घालण्यास प्रोत्साहित केले जाते.
दरम्यान तालुक्यातील पिसगाव येथील कै.गिरजाबाई माध्यमिक विद्यालयात १ ऑगस्ट रोजी स्काऊट-गाईड ‘जागतिक स्कार्फ डे’ मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला.
यावेळी कै. गिरजाबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक राकेश ठाकरे,स.शिक्षक कल्पना ठेंगणे,दीपक बलकी,रमेश तेलंग यांचेसह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.