
– तारेच्या कुंपणासाठी सुरू असलेले उपोषण मागे
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील वरुड येथील शेतकरी शेतात तारेची कुंपण करीत असता शेजारील शेतकऱ्याने तारेच्या कुंपण होऊ देण्यास मज्जाव केल्याने पीडित शेतकऱ्याने ही बाब वारंवार प्रशासनाच्या लक्षात आणून दिली.
सदर बाब प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्याने अखेर आठ मे रोजी पीडित शेतकऱ्याने येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असता जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांचे मध्यस्थीने सदर उपोषणावर तोडगा काढण्यात आला असून उपोषण मागे घेण्यात आले आहे.
तालुक्यातील वरुड येथील शेतकरी पांडुरंग बिजाराम भट यांचे वरुड येथे शेत असून ते आपल्या शेतात तारेचे कुंपण करू इच्छित होते. परंतु गेल्या सहा महिन्यापासून शेजारील शेतकऱ्याने त्यांना तारेचे कुंपण करण्यास पुरता मज्जाव केल्याने त्यांनी अनेकदा ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
प्रशासनाने सदर बाब गांभीर्याने घेतली नसल्याने अखेर पांडुरंग भट यांनी आठ मे रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाची हत्यार उपसत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
दरम्यान पीडित शेतकऱ्याचे दुःख लक्षात घेता जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराना यांनी यात मध्यस्थी करून सदर उपोषणावर तोडगा काढला.
पांडुरंग भट यांना फळांचा रस पाजुन सदर आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी तहसीलदार दीपक पुंडे,जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांचे सह रवी पोटे ,सचिव निलेश तेलंग, समीर कुडमेथे ,अंकुश माफुर,रॉयल सय्यद ,भाजप तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे,न.प.नगरसेवक वैभव पवार,भा.ज.यु.मो.चे अनुप महाकुलकर सुद्धा यावेळी उपस्थित होते.
मोजणीच्या सीमा निश्चित करून पुढील आठ दिवसात प्रकरण निकाली काढण्यात येईल.
मा.तहसीलदार – दीपक पुंडे , मारेगाव.