
♦जनहित कल्याण संघटनेची आठ महिन्यांत सामाजिक कार्यात उत्तुंग भरारी…
♦सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभाग.
♦आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यावर भर.
♦ लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगांव
सामाजिक बांधिलकी जोपासत कुठलाही राजकीय वारसा नसतांना तालुक्यातील तरुणाई सोबत घेवुन याच शिलेदाराच्या अथक परिश्रमातुन जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांच्या संकल्पनेतुन जनहित कल्याण संघटनेची पायाभरणी करण्यात आली.आज जनहित कल्याण संघटनेला पुर्ण आठ महिने होत असतांना,सर्वसामान्यांच्या दुःखात सहभागी होऊन गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यावर जनहित कल्याण संघटनेचा भर असुन या आठच महिन्यात संघटनेची “उत्तुंग भरारी” उरात धडकी भरवणारी ठरत असुन जनहित कल्याण संघटनेचे इवलेसे रोपटे मात्र गोरगरीब जनतेला आधारवड ठरत असुन बहरतेय.
तालुक्यात अनेक संघटना समोर आल्या कामेही केली असतील परंतु त्यामागे कुठेतरी भविष्यातील स्वार्थाची अंधुक ठीणगी दिसत होती. शंभराच्यावर गाव खेडी असलेल्या मारेगाव तालुक्यात पेसा अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतची संख्या जवळपास अर्धी आहे.निसर्गाने नटलेल्या तालुक्यातील अनेक गाव पाडे निसर्गाच्या कुशीत वसली आहेत.त्यामुळे कष्टकऱ्यांची संख्या तालुक्यात प्रचंड प्रमाणात आहे. औद्योगिक दृष्ट्या तालुक्यात एकही कारखाना नसल्याने बेरोजगार युवकांची फौज दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे नैराश्यामधुन अनेक युवक, शेतकरी शेतमजुर यांच्या आत्महत्येत सातत्याने वाढ होत आहे.
तालुका स्थळी टोलेजंग ग्रामीण रुग्णालय असले तरी अधिकारी कर्मचारी यांची कमतरता, तसेच सोयी सुविधेचा अभाव. सर्व सामान्य कुटुंबातील रुग्णाला इसिजी, एक्स-रे करायचा झाल्यास वणी, यवतमाळ येथे पाठवावे लागत असल्यांने सामाजिक भान जोपासत गौरीशंकर खुराणा या युवकाच्या संकल्पनेतुन सामाजिक बांधिलकीची जाण व समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द असणाऱ्या शिलेदारांच्या सहकार्याने जनहित कल्याण संघटनेची ता.५ जुलै २०२२ पायाभरणी करण्यात आली.
कुणाच्या ध्यानी मनी नसतांना जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा व त्यांच्या शिलेदारांनी सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालयाला इसीजी मशिन भेट देत सर्वसामान्यांच्या सेवेत रुजु केली. मात्र यानंतर जनहित कल्याण संघटनेनी मागे वळुन न पाहता आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत, कुठे धान्य, कुठे आर्थिक मदत दिली. पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. शहरात शव वाहीनी, रुग्ण वाहीका उपलब्ध करून देत सर्व सामान्य जनतेचा आर्थिक भार कमी केला. आत्महत्या करु नये यासाठी जन जागृती कार्यक्रमासह शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घेत आज आठ महिन्याच्या अवधित उत्तुंग भरारी घेतल्याचे दिसत असले तरी संस्थापक अध्यक्ष मात्र या सर्व कार्याचे श्रेय जनहित कल्याण संघटनेच्या शिलेदारांनाच देतात.