
— वार्षिक आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिला सज्जड दम
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
जनतेच्या हितासाठी अनेक कल्यानकारी योजना असुन त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेस मिळालाच पाहीजे. त्यांना वेठीस धरु नका असा सज्जड दम वणी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी, ता. २ जूलै रोजी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित वार्षिक आढावा बैठकीत दिला.
कृषी उत्पन्न बाजार. समितीच्या सभागृहात घेण्यात
आलेल्या बैठकीला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जि.प. सदस्य तथा काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या अरुणाताई खंडाळकर यांचेसह भाजपचे तालुकाध्यक्ष तथा सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, काँग्रेस तालुकाध्यक्ष मारोती गौरकार, भाजपचे ज्ञानेश्वर चिकटे, अंकुश माफुर, गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे, प्रभारी तहसीलदार महेश रामगुंडे, ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी एन. पी. काळबांडे आदी उपस्थित होते.
आढावा बैठकीत तालुक्यातील उपस्थित सरपंच, उपसरपंच, नागरिककांनी वेगवेगळ्या विषयावर तक्रारी मांडल्या. यात आरोग्य विभाग,बांधकाम, महसूल, विज वितरण विभाग, जल जीवन विभागाच्या तक्रारी मांडल्या. काही विभागाकडून नागरीकांचे समाधान झाले नसल्याने आमदार बोदकुरवार यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
केंद्र तथा राज्य सरकारकडून जनतेच्या हितासाठी अनेक कल्यानकारी योजना असुन त्या योजना तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून वेळेत सर्वसामान्य जनतेस लाभ मिळाला पाहीजे. यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना जनतेस वेठीस धरु नये, व कामचुकारपणा करु नये असा सज्जड दम या आढावा बैठकीत वणी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी दिला.