
– जनहित कल्याण संघटना तथा गावकऱ्यांचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या पिसगाव येथे १८ एप्रिल रोजी जनहित कल्याण संघटना तथा गावकऱ्यांच्या पुढाकाराने जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांचे प्रमुख उपस्थितीत भक्तिमय वातावरणात ‘जगन्नाथ महाराज दिंडी’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून समस्त गावकऱ्यांनी या पालखी सोहळ्यात महाराजांच्या भक्तीत ओले चिंब होत सहभाग नोंदविला.
जनहित कल्याण संघटना मारेगाव व समस्त पिसगाव वासियांच्या पुढाकाराने गावातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढून जगन्नाथ बाबा पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात उपस्थित मंत्रमुग्ध होत महाराजांच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे चित्र दिसून आले. गावातील प्रत्येक घरासमोर काढलेली काढलेली रांगोळी पालखीची शोभा वाढवत होती. पालखी सोहळ्यास उपस्थितांनी पालखीचे दर्शनास एकच गर्दी केली होती.
आज सायंकाळी पाच वाजता काल्याचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराना, रवी पोटे,अंकुश माफुर, मारोती गौरकार तसेच जनहित कल्याण संघटनेचे तालुका पदाधिकारी यांचेसह जनहित कल्याण संघटनेचे पिसगाव शाखा अध्यक्ष भुषण कोल्हे,दिलीप उलमाले,रमेश झाडे,हनुमान जुमनाके,श्रीराम गेडाम,नागो आत्राम ,सुरेश पेंदोर,नामदेव पाचभाई सह संपुर्ण जनहीत ग्रुप पिसगांव तथा समस्त गावकरी उपस्थित होते.