
– दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
नुकताच दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून आता सर्वांना वेध लागलेय ते प्रवेश कुठे घ्यावयाचा….? दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यां करिता सुवर्णसंधी आहे.
आयटीआय प्रवेशाची ही प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडणार असून सुरुवातीस ऑनलाईन रजिस्ट्रेशन नंतर कागदपत्र पडताळणी करिता प्रत्यक्ष आयटीआय मारेगाव येथे जावे लागणार आहे.
पात्रता: 10 वी पास. ( वेल्डर आणि शिविंग टेक्नॉलॉजी साठी 10 वी अनुत्तीर्ण चालेल.)
गव्हर्नमेंट आयटीआय मारेगाव येथे पुढील ट्रेड उपलब्ध आहेत.
१. इलेक्ट्रिशन
२. मोटर मेकॅनिक वेहिकल
३. फिटर
४. वेल्डर
५. कोपा
६. शिवींग टेक्नॉलॉजी
७. बेसिक टेक्नॉलॉजी
कॉलेज लिंक
https://g.co/kgs/fgjov9
प्रवेश प्रक्रिये बद्दल अधिक माहिती करिता संपर्क करु शकता. (8605309653)