
– विद्यार्थ्यांसह पालकांची लक्षणीय उपस्थिती
– विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याची थाटात सांगता
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
‘विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच जिद्द व चिकाटीची कास धरल्यास यशो शिखर गाठणे शक्य आहे’ असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणात पुसद अर्बन बँकेची उपाध्यक्ष व क्रांती युवा संघटनेचे संस्थापक राकेश खुराणा यांनी १५ ऑगस्ट रोजी स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात केले.यावेळी अवघ्या तालुक्यातील पालकांसह विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
जनहित कल्याण संघटना मारेगाव,क्रांती युवा संघटना वणी व पुरोगामी पत्रकार संघटना मारेगाव यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ख्यातनाम लेखक, मराठी भाषा प्रमाण लेखन, पीएच.डी प्रबंधाचे मुद्रित शोधन करणारे व पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेले दीपक रंगारी यांनी मराठी भाषेचे लेखन व वाचन यावर प्रकाश टाकला. मराठी भाषेचे वाचन,व्याकरणात होणाऱ्या चुका या विषयावर त्यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांचा क्लास घेतला.
कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका सुनयना येवतकर यांनी आपल्या धडाकेबाज भाषणातून महिलांच्या सबलीकरणावर यथोचित मार्गदर्शन केले. शेकडो वर्षांपासून महिलांबाबत सुरू असलेल्या रूढी परंपरांना फाटा देऊन आजच्या स्त्रीला समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करण्याची गरज असल्याची बाब त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.
या गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुसद अर्बन बँकेचे उपाध्यक्ष तथा क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राकेश खुराणा होते.तर उद्घाटक मारेगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की तर मार्गदर्शक दिपक रंगारी , मार्गदर्शिका महिला जिल्हाध्यक्षा, महात्मा ज्योतिबा फुले समता परिषद यवतमाळ सुनयना येवतकर, प्रमुख अतिथी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन खंडेराव, माजी प्राचार्य भास्करराव धानफुले, बाजार समिती संचालक यादवराव काळे, खडसे ,प्रफुल विखनकर, सरपंच रविराज चंदनखेडे, जनहित कल्याण संघटना मारेगावचे अध्यक्ष समीर कुडमेथे ,उपाध्यक्ष रॉयल सय्यद, महिला अध्यक्षा कविता मडावी, सचिव सुवर्णा खामनकर, रवी पोटे ,सागर लोणारे, तुळशीराम कुमरे, अंकुश माफुर , आकाश बदकी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन भास्कर राउत यांनी केले.प्रास्ताविक सुमित गेडाम यांनी तर आभार सुरेश नाखले यांनी मानले.
विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यास पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रत्येक शाळा व महाविद्यालयातून प्रथम येणाऱ्या तालुक्यातील ४३ विद्यार्थ्यांचा मोमेंटो व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता पुरोगामी पत्रकार संघाचे मोरेश्वर ठाकरे ,सुमित हेपट, गजानन आसुटकर, धनराज खंडरे, गजानन देवाळकर, सुरेश पाचभाई, आनंद नक्षीने, भैय्या कणाके ,शरद खापणे यांचे सहकार्य लाभले.