
— ग्रामपंचायत कानडा चा अभिनव उपक्रम
— महिलांना सॅनिटरी नेपकिन वितरण
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन ग्रामपंचायत कानडाच्या सरपंचा सौ.सुषमा रुपेश ढोके यांच्या संकल्पनेतुन, ग्रामपंचायत कानडा च्या वतीने महिला जनजागरण कार्यक्रम राबविण्यात आला असुन याच कार्यक्रमात महिलांना सॅनिटरी नेपकिन वितरण करण्यात आले.
महिला जनजागरण कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुषमा रुपेश ढोके,तर मार्गदर्शक म्हणून आरोग्य सेविका प्राथमिक आरोग्य केंद्र मार्डी श्रृती गलाट होत्या. दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विज्ञान व भौतिक जगात जीवन जगत असतांना मानवाची दिनचर्या ही आठ तासात एक तर चोवीस तासांत तीन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) विभागली गेली आहे. आज महिला पुरुष समानता आहे त्यामुळे महिला सुध्दा मानसाच्या बरोबरीने काम करतात. हे करत असतांना आरोग्य सुध्दा ठणठणीत असणे आवश्यक असले तरी महिलांकडून याला बगल दिल्या जात असल्याचे वास्तव पहायला मिळते.
आजही ग्रामीण भागातील महिलां अनेक आजार अंगावर काढतात. अनेक आजारांबाबत अजूनही माहिती नसल्यामुळे आजार दिवसेंदिवस वाढत जावुन व आजार परिस्थिती बाहेर जावुन वेळप्रसंगी अनेक महिलांना प्राण सूद्धा गमवावे लागते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, व घरातूनच समाज ऋण काय आहे, याचे बाळकडु मिळालेल्या कानडा ग्रामपंचायत संरपचा सौ.सूषमा रूपेश ढोके यांच्या संकल्पनेतुन महिला जनजागरण कार्यक्रम ग्रामपंचायत च्या माध्यमातून राबविण्यात आला. महिलांना आरोग्य बाबत माहीती देत सॅनिटरी नेपकिन चे वितरण करण्यात आले.
यावेळी आशा सेविका वंदनाताई ढोके, ग्रा. पं. सदस्या कविता झीले, ग्रा.प. सदस्या रेखा आस्कर, संगीता येवले, अंगणवाडी सेविका गीता चवले, मेघा ढवस, पोलिस पाटील सूवर्ना येवले, श्रद्धा डाहूले, पुष्पा ढोके तथा गावातील महिला व कीशोरवयीन मूली उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार आशा वर्कर कानडा सौ. वंदना ढोके यांनी मानले.