
– विद्यमान सरपंच-माजी उपसरपंचांसह बहुतांश गावकऱ्यांची भाजपात थाटात ‘एंट्री’
– आमदारांच्या विकसनशील कार्यपद्धतीचा परिपाक
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून तालुक्यात बहुतांश पक्षांनी आपली पक्ष बांधणी सुरू केली आहे.यात भारतीय जनता पक्षाने आपली कंबर कसली असून ता. ८ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील अर्जुनी येथील सरपंच-माजी उपसरपंच यांचे सह शेकडो ग्रामस्थांनी भाजपात थाटात एंट्री केली.यास आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या विकसनशील कार्यपद्धतीचा परिपाक म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
सद्यस्थितीत मारेगाव तालुक्याचे राजकारण परमोच्च शिखरावर आहे.परिणामी यात कधी कोणता उलटपफेर होईल याची तिळमात्रही शाश्वती राहिलेली नाही.तुर्तास राजकारणात सुरू असलेल्या या ‘त्सुनामीत’ सर्वच राजकीय पक्षांनी आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून आपली गट बांधणी सुरू केली आहे.यात भाजपाही मारेगाव तालुक्यात कात टाकताना दिसतेय.
दरम्यान रविवारी ता. ८ ऑक्टोंबर रोजी तालुक्यातील अर्जुनी येथील सरपंच,माजी उपसरपंच यांचे सह स्थानिक नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशील कर्तुत्वाचा प्रभाव बघून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या कार्यशैली वर विश्वास ठेवून विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत थाटात पक्षप्रवेश केला.
यावेळी अर्जुनी येथील प्रथम नागरिक सरपंचा सौ.वंदना पुरुषोतम आत्राम,माजी उपसरपंच जयदीप मारोती लोडे,स्वप्नील कडू यांचेसह तब्बल ७२ नागरिकांनी मोठ्या दिमाखात भाजपात पक्ष प्रवेश केला.
यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचेसह भाजपा मारेगाव तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे,जिल्हा सचिव शंकर लालसरे,युवा शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर, कु.उ.बा.स.संचालक अविनाश लांबट,ज्येष्ठ नेते मायाताई गौरकार,सौ.शालीनी ताई दारुंडे ,भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तथा कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सौ.शालिनीताई दारुंडे यांच्या अथक प्रयत्नांती पार पडले.