
— माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आज ता. ९ ऑगस्ट रोजी राळेगाव विधान सभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राळेगाव येथे, माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्या पुढाकारातून, ज्येष्ठ शेतकरी संघर्ष योद्धा (हिवरादरणे) बाबासाहेब दरणे पाटील यांचे हस्ते जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा सकाळी ११ वाजता होणार असल्याने या कार्यक्रमास हजारोच्या संख्येत उपस्थित राहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांनी आवाहण केले आहे.
दरम्यान सकाळी ११ वाजता महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, आदिवासी समाज बांधवांचे श्रद्धास्थान भगवान बिरसा मुंडा, अन्नाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन, ज्येष्ठ शेतकरी संघर्ष योद्धा (हिवरादरणे) बाबासाहेब दरणे पाटील यांचे हस्ते तथा आदिवासी नेते एम. के. कोडापे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक राळेगाव बाबा कबीरदास नगराळे, बेंबळा कालवे शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष सुधीर पाटील जवादे, सामाजिक कार्यकर्ते सय्यद रहमान अली मेहमूद अली यांच्या प्रमुख उपस्थितीत, जागतीक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन ता ९ ऑगस्ट रोजी जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा सकाळी ११ वाजता होणार आहे.
यावेळी गरजवंत बांधवांना टी-शर्ट वितरण, स्पर्धा परिक्षेची आवड असणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना एम.पी. एस. सी. पुस्तकाचे वितरण, व ५० विद्यार्थ्यांना स्कुल बॅग वितरण करण्यात येणार असल्याची माहीती कार्यक्रमाचे आयोजक मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांनी दिली असुन या सोहळ्याला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य दिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी राळेगाव येथील कोल्हे सभागृहात देश भक्ती पर गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन अमरावती येथील सरगम ऑर्केस्ट्रा द्वारा करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात माजी सैनिक, वारकरी, तथा समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
संयोजक मा. अशोक मारुती मेश्राम
मा.वरिष्ठ पोलीस अधिकारी व मित्रपरिवार
७७ राळेगाव विधानसभा मतदारसंघ राळेगाव.