
– मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचा पुढाकार
– न्याय मिळेपर्यंत उपोषणाची ज्योत तेवत राहणार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील एमएसईबी उपविभागाकडून सुरू असलेले विजेचे लोडशेडिंग बंद करून शेतकऱ्यांसह तालुक्यातील जनतेला न्याय मिळावा याकरिता मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक पोलीस वेलफेअर पेट्रोल पंपा समोर मार्डी चौकात २३ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचे हत्यार उपसणार आहे.
तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या आमरण उपोषणास तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती गौरकार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक आकाश बदकी तसेच काँग्रेस कार्यकर्ते अंकुश माफुर अशी आमरण उपोषणास बसणाऱ्या उपोषण कर्त्यांची नावे आहेत.
दरम्यान गत काही दिवसापासून तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे.विज येण्याचे अथवा जाण्याचे निश्चित असे वेळापत्रक नाही.परिणामी शेती पिकांना पाण्याची नितांत गरज असताना महावितरण कडुन मनमानी कारभार सुरू आहे.यात बळीराजाचे प्रचंड नुकसान होत आहे.
या विरोधात तालुका काँग्रेस कमिटीने ३ दिवसांच्या अल्टिमेटमसह निवेदन सादर करण्यात आले होते.परंतु महावितरण कडून अद्याप निवेदनाची दखल घेतली गेली नाही.परिणामी ता.२३ ऑक्टोबर रोजी तालुका काँग्रेस कमिटीने स्थानिक पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंपा समोर मार्डी चौकात आमरण उपोषणाचे हत्यार उपसणार आहे.
सदर आमरण उपोषणात वीज वितरण विभागास शेतकरी व जनतेच्या हिताच्या विजे संबंधीच्या अनेक मागण्या करण्यात येणार आहेत. महावितरण कडून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सदर आमरण उपोषणाची ज्योत तेवत राहणार आहे.