
– मारेगाव शहरातील प्रकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीने उच्छाद माजवीला असून चक्क शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्याचे ईमारती समोर अवैध रेतीची साठवणुक सूरु असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात घर बांधनी सुरू असुन यासाठी प्रचंड प्रमाणात रेतीची गरज भासते.तुर्तास तालुक्यातील रेती घाट बंद असल्याने रेती मिळेनाशी झाली आहे.परिणामी रेती तस्करांची पुरती चांदी असुन शहरासह तालुक्यात अव्वाच्या सव्वा दराने अवैध रेती विक्रीला उधाण आले आहे.
दरम्यान अवैध रेतीची साठवणुक करण्याकरिता रेती तस्करांनी चक्क शासकीय जागेपर्यंत मजल मारली असून शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्याचा आधार घेतल्याचे वास्तव आहे.येथील पशुवैद्यकीय दवाखान्या समोर मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची साठवणुक केली जात आहे.
रेती तस्करांनी अवैध रेती साठवणुकी करिता चक्क शासकीय जागेचा आधार घेतल्याने प्रशासन सदर बाबीबद्दल अनभिज्ञ आहे की याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे…? असा खोचक सवाल जनताजनार्दनातुन आता उपस्थित होऊ लागला आहे.