
– महिलांची पो.स्टे.वर धडक
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
बोटोनी येथे गेल्या काही दिवसापासून अवैध दारू विक्रीने कळस गाठला असुन तरुण पिढी दारूचा घोट घेत नशेच्या आहारी जात असल्याचे विदारक वास्तव दिसून येत आहे.दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक कलह निर्माण होऊन परिसरातील अनेक कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आली आहे.अवैध दारू विक्री विरोधात येथील महिलांत प्रचंड संतापाची लाट उसळली असुन अवैध दारू विक्रीला तात्काळ लगाम लावण्यासंबंधीचे निवेदन ता.२५ मे रोजी बोटोनी येथील महिलांनी मारेगाव पो.स्टे.ला दिले.
तालुक्यातील बोटोनी हद्दीत राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.तरुण व्यसनाधीन झाल्याने कौटुंबिक कलह वाढत असुन मद्यपींचे दारू पिऊन महिलांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे.
बोटोनी येथील संजय पायलवार,सुरेश चिकटे व लैजाबाई नामक एक महिला अगदी बिनदिक्कतपणे अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करतात.
अवैध दारू विक्रीमुळे परिसरातील वातावरण दूषित होत असून गावातील शांतता व सुव्यवस्था भंग पावत असल्याने बोटोनी येथील अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्यात यावी या आशयाचे निवेदन येथील महिलांनी २५ मे रोजी मारेगाव पोलीस स्टेशनला दिले.
यावेळी बोटोनी येथील माजी प. सदस्या सौ.सुनीता लालसरे, सरपंचा सौ.सुनिता जुमनाके ,सविता स.मत्ते, वैशाली रा. गानफाडे, वेनूबाई तुरणकार ,किरण तुरणकार, सरिता मत्ते, वनिता सिडाम ,सुरेखा निंदेवार, रंजना दोडेवार यांचेसह बोटोनी येथील शेकडो महिला उपस्थित होत्या.
यापुर्वीही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आज पुनश्च पोलीस पथक पाठवून आरोपींना ताब्यात घेण्यात येईल.
राजेश पुरी – ठाणेदार,पो.स्टे.मारेगाव.