
– मारेगावातील शेख कुटुंबाचा पडोली येथे अपघात
– संपूर्ण कुटुंब अपघातात ठार झाल्याची माहिती
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली नजीक झालेल्या भीषण अपघातात मारेगावातील शेख कुटुंबावर काळाने घाला घातल्याची दुःखद घटना २३ जून रोजी दुपारी घडली. एका क्षणात हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मारेगाव येथील शानु ऑटोमोबाईल्स व सानिया कोल्ड्रिंक हाऊसचे संचालक युसुफ शेख व रफिक शेख हे सहकुटुंब राजुरा येथील विवाह सोहळा आटपून मारेगाव येथील स्वगृही परत येत होते.
दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली-घुगुस मार्गावरील अहमद लाॅन (चिंचोळा) नजीक त्यांचे बोलेरो गाडीचा (क्र.एम.एच.२९ बी.सी. ६३२१) स्टेरिंग रॉड तुटल्याने गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी डिव्हायडर ओलांडुन दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकला धडकली.ही धडक इतकी भीषण होती की त्यांचे गाडीचा समोरील भाग पुरता चकनाचुर झाला.यात गाडीतील चारही व्यक्ती अपघात स्थळीच ठार झाले.
शेख युसुफ शेख नबी,शेख रफिक शेख नबी,मुमताज युसुफ शेख,संजीदा रफीक शेख असे अपघातात ठार झालेल्या चारही व्यक्तींची नावे आहेत.
असून सदर घटनेने शेख कुटुंबीयांवर पुरता दुःखाचा डोंगर कोसळला असुन परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.