
– तीन ठार,एक गंभीर जखमी
– कोठोडा येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पेपर वाहून नेणाऱ्या ओमनी गाडीची कोठोडा येथे समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघात तीन जन ठार तर एक जन गंभीर जखमी झाल्याची घटना ११ जुलै रोजी सकाळी ६:४५ वाजेदरम्यान घडली. अपघात होताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला.
किशोर बोरकर (५०) असे ओमनी टॅक्सी चालकाचे नाव असून वृत्तलिहेपर्यंत इतर तीन व्यक्तींची नावे कळु शकली नाही.
दरम्यान ११ जुलै रोजी सकाळी ६:४५ वाजेदरम्यान वरोरा येथून पांढरकवडा येथे पेपर वाहून नेण्याकरिता निघालेली लोकसत्ता पेपरची ओमनी गाडी करंजी नजीक कोठोडा येथे समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली.यात ओमनी गाडीचा अक्षरशः चुराडा झाला.परिणामी ओमनी गाडीतील तीन व्यक्ती जागीच ठार झाले तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीला पुढील उपचारार्थ यवतमाळ येथे हलविल्याची माहिती आहे.