
– यवतमाळ येथे सत्कार सोहळा संपन्न
लोकशस्त्र न्युज नेटवर्क :मारेगाव
शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांचे विद्यमाने ता. २० एप्रिल रोजी यवतमाळ येथील वसंतराव नाईक सभागृह जि. प. यवतमाळ येथे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात सन २०२०-२१ व २०२१-२२ चा पुरस्कार हेमराज गणेश कळंबे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तथा त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यात जि. प. शाळा धामणी पंचायत समिती मारेगाव येथिल ओबिसी जनजागृती समितीचे सदस्य, उत्कृष्ट वक्ता, उपक्रमशील शिक्षक, गुरुदेव सेवक, उत्कृष्ट खेळाडू, अनेक क्षेत्रात असलेले हेमराज गणेश कळंबे यांना २०२१-२२ आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.यवतमाळ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते शाल,श्रीफळ सह मोमेंटम व प्रमाणपत्र देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला.