
– एकाच कुटुंबातील चार पार्थिवांची कब्रस्तानाकडे कुच
– उपस्थितांच्या हृदयाला पाझर : अनेकांची अश्रूंना वाट मोकळी
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
नियतीच्या मनात काय असते, याचा कुणालाच थांगपत्ता लागत नाही.अचानक कुणाचं या जगातून निघून जाणं…हे काळजाला चटका लावणारच ठरते.नियती कधी कोणता डाव साधेल याचा नेम नाही.घुग्गुस-चंद्रपूर मार्गावर २३ जुन रोजी झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांसह मारेगावातील एकाच कुटुंबातील चार व्यक्ती घटनास्थळीच ठार झाल्याने ही बाब अधोरेखीत केली आहे.
शुक्रवारी चंद्रपूर येथे उत्तरीय तपासणी करून रात्री ९ वाजता चारही पार्थिव मारेगाव येथे स्वगृही आणन्यात आले.यावेळी कुटुंबीयांसह नातेवाईकांचा आक्रोश काळीज चिरणारा होता. कुटुंबाचा आधारवड कायमचा गमावलेल्या मुलांच्या आर्त टाहोने उपस्थितांच्या हृदयाला पाझर फुटला.परिणामी अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
संबंधित बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…!
https://lokshashtr.in/horrible-accidents-comedy-games/
शनिवारी सकाळी ११ वाजता चारही पार्थिवांनी शेकडोंच्या उपस्थितीत एकाच वेळी कब्रस्तान कडे कुच केली.येथील गौसिया मस्जिद येथे चारही पार्थिवांना मुस्लिम रितीरिवाजाने अंतिम विदाई देण्यात आली.
कित्येक वेळा सत्य हे कल्पनेपेक्षाही दाहक असत.काय परिस्थिती असेल त्या मुलांची…? किती प्रश्नांचे काहूर माजले असेल त्यांच्या मनात ज्यांनी आपल्या आई-वडीलांना एकाच दिवशी एकाच वेळी कायमच गमावलं…? नुसती कल्पना केली तरी अंगाला शहारे आणणाऱ्या घटनेचे ‘ती मुल’ प्रत्यक्ष साक्षीदार आहेत.नियतीची किती क्रूर थट्टा ही…!
‘तो’ अपघात अनेकांच्या डोळ्यात तरळला…!
पाच वर्षांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघाताची सल शहरवासीयांच्या मनात आजही कायम आहे.१७ फेब्रुवारी २०१८ रोजी एका भयावह अपघातात हसत्या-खेळत्या कुटुंबावर नियतीने आपला डाव साधला होता.त्यात एकाच कुटुंबातील तीन करत्या व्यक्तींचा मृत्यू ओढवला होता.मारेगावातील सीडाना कुटुंबीयांसोबत झालेला ‘तो’ भीषण अपघात काल झालेल्या अपघातानंतर अनेकांच्या डोळ्यात तरळुन गेला.